परीक्षा शुल्क वाढीचा निषेध करतबेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
परीक्षा शुल्क वाढीचा निषेध करत बुधवारी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. परीक्षा शुल्क वाढविणाऱ्या धोरणाचा पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी निषेध केला. आम्ही ग्रामीण भागातील मुले आहोत, आम्ही कृषी पार्श्वभूमीतून आलो आहोत आणि आम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही. अशा परिस्थितीमध्ये शुल्क वाढविणे योग्य नाही. शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी महादेव कुंचनूर, भिमाप्पा गेनूर, रोहित कांबळे, भिमनागौडा यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी निषेधात भाग घेतला होता.


Recent Comments