एकीकडे आयसीसीचे अध्यक्ष खरगे म्हणाले होते कि कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत. तर दुसरीकडे केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार सहकुटुंब कुंभमेळ्यात स्नान केले असून आपले सगळे पाप धुतल्याचे विधान केले आहेत. यापैकी मूळ काँग्रेस कोणती आणि नकली काँग्रेस कोणती ? याचा उत्तर खर्गेनी द्यावा असे विरोधी पक्षनेते आर अशोक म्हणाले.

आज बेंगळुरू येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षांच्या आदेशाचे उल्लंघन करून कुंभमेळ्यात स्नान करण्याचे धाडस करणारे डीसीएम डी.के. शिवकुमार यांचे आपण अभिनंदन करतो. उत्तर प्रदेशातील सरकारी व्यवस्थेचे कौतुक केले आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्वतः कुंभमेळ्यात स्नान करून आपले पाप धुतल्याचे विधान केले आहे. आता कोणावर विश्वास ठेवायचे? यापैकी मूळ काँग्रेस कोणती आणि नकली काँग्रेस कोणती ? याचा उत्तर खर्गेनी द्यावा असे ते म्हणाले.
उदयगिरी हे केरळच्या जवळ आहे, जिथे हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भाजप उभा राहील. राज्यातील वाळू घोटाळा थांबवण्याचा कोणताही मार्ग नाही .काँग्रेस आमदारांना विकासासाठी अनुदान हव्या आहेत त्यासाठी त्यांच्याकडे वाळू माफिया किंव्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या हे दोनच पर्याय आहेत. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. भद्रावती येथील महिला पोलिस अधिकाऱ्यावरील हल्ला लपवण्यात येत आहे .
यत्नाळ आणि बी.वाय. विजयेंद्र यांच्यातील मतभेदांबद्दल बोलताना ते म्हणाले कि, केंद्रीय नेत्यांनी यावर कोणतेही विधान करू नये असे आदेश दिले आहे. हा मुद्दा दिल्लीच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे आणि केंद्रातील नेते त्याची दखल घेत आहेत. काही दिवसांत यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
Recent Comments