Belagavi

कर्नाटक लेखिका संघ बेळगाव जिल्हा शाखेचा वर्धापन दिन

Share

अलिकडच्या काळात, मानवी नातेसंबंध नाहीसे होत आहेत. प्रत्येकजण स्वतःमध्येच व्यस्त होत आहेत. भावनात्मक संबंध आता उरले नाहीत अशी खंत धारवाडच्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर हेमा पट्टणशेट्टी म्हणाल्या.

आज बेळगावातील राणी चेन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवनात कर्नाटक लेखिका संघ बेळगाव जिल्हा शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कर्नाटक महिला लेखिका संघाच्या अध्यक्षा डॉक्टर के. आर. सिद्धगंगम्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून धारवाडचे ज्येष्ठ लेखिका डॉ. हेमा पट्टणशेट्टी, यक्षगान कलाकार आणि लेखक डॉ. प्रज्ञा मत्तिहळ्ळी उपस्थित होत्या. यावेळी धारवाडच्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर हेमा पट्टणशेट्टी म्हणाल्या कि, अलिकडच्या काळात, मानवी नातेसंबंध नाहीसे होत आहेत. प्रत्येकजण स्वतःमध्येच व्यस्त होत आहेत. भावनात्मक संबंध आता उरले नाहीत .

त्यानंतर यक्षगानाचे सादरीकरण झाले. या प्रसंगी संघाच्या उपाध्यक्षा ज्योती बदामी, सचिव डॉ. निर्मला बट्टल, कोषाध्यक्ष डॉ. नीता राव, सुधा पाटील, सुमा कित्तूर, रंजना गोधी, प्रेमा तहसीलदार, जयशिला ब्याकोड, हमीदा बेगम, श्वेता नरगुंद, ललिता कोपर्डे, राजनंदा गार्गी आणि इतर सहभागी होते.

Tags: