सवदत्ती येथील श्री यल्लम्माच्या डोंगरावरून येणारी बस बागलकोट जिल्ह्यातील सीतीमनीजवळ नियंत्रण सुटून उलटल्याने पाच जण जखमी झाले.
सवदत्ती येथील श्री यल्लम्माच्या डोंगरावरून बागलकोट जिल्ह्यातील सीतीमनी येथील श्री सीताम्मादेवीच्या मंदिराकडे जात असताना बस उतारावर नियंत्रण गमावून उलटली. या बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. त्यापैकी पाच जण जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्यांना निडगुंदि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बागलकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments