आर्यन फन स्कूल शाळेमध्ये आज वार्षिक क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक वर्गाच्या मुलांनी हाऊस वाईज मार्च पास्ट करून शाळेतील क्रीडा पारंगत विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत पेटवली.. कार्यक्रमाची सुरुवात आकाशात फुगे सोडून करण्यात आली.
मुख्याध्यापक सौ. सरोजा सदलगे यांनी खेळाचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व सांगून मुलांना मार्गदर्शन केले. पूर्वप्राथमिक वर्गाच्या मुलांनी ताली योगा सादर केली.त्यानंतर पळण्याची , हम्प्टी डंमटी सायकल स्पर्धा, अडथळ्यांची आकर्षक स्पर्धा,तसेच प्राथमिक व माध्यमिक वर्गानी लिंबू चमचा, रीले, पळण्याची स्पर्धा अशा विविध क्रीडा स्पर्धांचे धमाकेदार दर्शन घडवले.

यावेळी पालकांनी देखील उत्साहाने स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. वैभवी भोसले यांनी केले .या क्रीडा प्रात्यक्षिकां साठी शाळेच्या मुख्याध्यापिका, कमिटी मेंबर्स व क्रीडा विभागाचे अधिकृत शिक्षक श्री दिपक पाटील सरांचे व सर्व शिक्षक वर्गाना व मुलांना मार्गदर्शन लाभले.


Recent Comments