Belagavi

प्रा. बी. एस. गविमठ साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे पुरस्कार प्रदान; पुस्तक प्रकाशन

Share

प्रा. बी. एस. गवीमठ साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, संकेश्वर बेळगाव तर्फे पुरस्कार प्रदान समारंभ आणि डॉ. प्रभाकर कोरे अभिनंदन ग्रंथ द्वि मू. प्रकाशन समारंभ १६ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे होणार आहे असे प्रा. बी. एस. गवीमठ यांनी सांगितले.

ते आज बेळगाव शहरात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रा. बी. एस. गवीमठ साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, संकेश्वर बेळगाव तर्फे पुरस्कार प्रदान समारंभ आणि डॉ. प्रभाकर कोरे अभिनंदन ग्रंथ द्वि मू. प्रकाशन समारंभ १६ फेब्रुवारी रोजी शहरातील नेहरूनगर कन्नड भवन येथे होणार आहे. नीडसोसी सिद्धसंस्थानमठाचे पूज्य जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी या समारंभाला उपस्थित राहतील.

अध्यक्षस्थानी प्रा. एल. व्ही. पाटील प्रभारी हे उपस्थित असलतील. केएलई संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे याचे उद्घाटन करतील. निवृत्त आयएएस अधिकारी आणि शरण साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर हे पुरस्कार प्रदान करतील. डॉ. गुरुपाद मरिगुद्दी असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत, फाउंडेशनचे अध्यक्ष एल.व्ही. पाटील, सचिव अकबर सनदी, वाय.आर. पाटील, बसवराज गार्गी, रामचंद्र कट्टी, महेश गुरनगौडा आणि इतर उपस्थित होते.

Tags: