Belagavi

जिल्हा दूरसंचार निगम मंडळाच्या सल्लागार समितीवर गुणवंत सुतार यांची निवड

Share

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते बोकनूर गावचे सुपुत्र गुणवंत सुतार यांची नुकतीच बेळगाव जिल्हा दूरसंचार निगम मंडळाच्या सल्लागार समितीवर नेमणूक झाली आहे,

भारतीय जनता पार्टीचे माजी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या विनंतीने राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या शिफारशी नुसार केंद्रीय दूरसंचार निगम मंडळ संचालक उर्मेशी सागवन यांच्या आदेशानुसार ही नेमणूक झाली आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कडून व समाजातील विविध स्थरावरील मान्यवरांच्या कडून गुणवंत सुतार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आज गुणवंत सुतार यांनी भाजपा माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या निवासस्थानी भेट घेतली व धन्यवाद दिले व धनंजय जाधव यांनी गुणवंत सुतार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी अनिल पाटील, शहाजी जाधव व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: