वडगाव येळ्ळूर रोड, बेळगाव येथील सार्वजनिक श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळाच्या वतीने 2025 सालच्या गणेशमूर्ती उभारणीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

वडगाव येळ्ळूर रोड, बेळगाव येथील सार्वजनिक श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळाच्या वतीने 2025 सालच्या गणेशमूर्ती उभारणीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम मंदिरात गणपतीची विशेष पूजा करून महाआरती करण्यात आली. अनंत देसुरकर, प्रदिप दळवलकर , मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मूर्तिकार मनोहर पाटील यांनी गेल्या वेळीही बेळगावच्या अष्टविनायक नगरमध्ये 21 फूट उंच गणेशमूर्ती बनवली होती. यावेळीही नव्या निर्धाराने मूर्ती साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची माहितीही मंडळाच्या नेत्यांनी दिली. यावेळी शेकडो गणेशभक्तांचा सहभाग होता.


Recent Comments