Dharwad

मुख्यमंत्री सिद्धरामय्या याना मुडा प्रकरणी मोठा दिलासा : स्नेहमयी कृष्णा यांचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला

Share

मुडा प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याचा स्नेहमयी कृष्णा यांचा अर्ज धारवाड हायकोर्टाने फेटाळला आहे . हायकोर्टाने आज या अर्जावर निर्णय घेऊन अर्ज फेटाळला आहे .

स्नेहमयी कृष्णा यांनी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या विरोधातील मुडा घोटाळ्याच्या तपासासाठी सीबीआय कडे प्रकरण देण्यासाठी धारवाड उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता . . हायकोर्टात या अर्जावर चर्चा करण्यात आली आणि न्यायाधीश नागप्रसन्न यांच्या अध्यक्षतेखाली अर्जावर निर्णय घेण्यात आला.

सध्या धारवाड हायकोर्टात ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली, आणि न्यायाधीशांनी अर्ज फेटाळून मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना मोठा दिलासा दिला.

Tags: