Belagavi

मलप्रभा नदी किनाऱ्यावर आढळली मगर : शेतकऱ्यांमध्ये घबराट!

Share

खानापूर तालुक्यातील माटोळी जॅकवेल जवळ मलप्रभा नदीत एक मगर आढळली असून माटोळी आणि आसपासच्या गावांच्या लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

नदीत मगर पोहत असताना आणि मगर नदीच्या काठावर उन्हात पहुडलेली असल्याचे दृश्य स्थानिकांच्या मोबाइलमध्ये कैद झाले आहे.

नदीच्या काठावर वेळोवेळी दिसणारी महाकाय मगरीचे दृश्य , तरुण मोबाइल कॅमेरात टिपून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामुळे नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आणखी घबराट पसरली आहे.

Tags: