खानापूर तालुक्यातील मंतुर्गा गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी 3 लाख रुपयांचे अनुदान आ . विठ्ठल हलगेकर यांनी मंजूर केले आहे.
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
मंतुर्गा गावातील मराठी प्राथमिक शाळेचे छत कोसळले आहे आणि पावसाळ्यात पाणी साचून भिंतींना नुकसान होत आहे. दरवाजे आणि खिडक्यांचे देखील नुकसान झाले आहे . ज्यामुळे शाळा कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबद्दल भाजपा नेत्यांनी आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी आमदारांशी संपर्क साधला आणि त्याच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर आमदारांनी या शाळेसाठी अनुदान मंजूर केले आहे.
Recent Comments