बेळगावमधील उषा कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदीराच्या लोकार्पणाचा दशक महोत्सव आणि 14 वा वार्षिक जत्रा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.
बेळगावमधील , बॉक्साइट रोडवरील कॉलनीतील श्री महालक्ष्मी मंदीराच्या लोकार्पणाचा दशमानोत्सव आणि 14 वा वार्षिक जत्रा महोत्सव फेब्रुवारी २ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह आयोजित करण्यात आला. यामध्ये गणहोंम, सुदर्शन होम, सामूहिक विवाह, नृत्यांजलि, रुद्राभिषेक, चंडिकाहोम आणि इतर धार्मिक विधींचा समावेश करण्यात आला.
हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रथसप्तमीच्या दिवशी पाच सामूहिक विवाह आयोजित करण्यात आले. आज ओटी भरण्यासहीत , कुंकुमार्चन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, असे मंदीर समितीचे सतीश माळवदे यांनी सांगितले.
आज ४००-५०० महिलांनी श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राचे पारायण केले. दुपारी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली, आणि बेळगाव शहराच्या डॉ. आंबेडकर नगर, शाहू नगर, सदाशिवनगर, बॉक्साइट रोड, हनुमाननगर, कुवेंपू नगर, सह्याद्रिनगर अशा आसपासच्या भागातील हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले, असे मंदीर समितीचे सागर वर्पे यांनी सांगितले. अनेक भक्तांनी या धार्मिक विधीमध्ये भाग घेतला.
Recent Comments