Belagavi

केलेले कर्म आणि मिळवलेली कीर्तीच माणसासाठी शाश्वत; मुख्यमंत्री त्यागराज

Share

माणसासाठी काहीच शाश्वत नाही. त्याने केलेले कार्य आणि मिळवलेली कीर्तीच माणसासाठी शाश्वत असते . तत्त्वज्ञांचा संदेश समजून माणसाने त्याचं सत्य आत्मसात करावं, असं आवाहन बेळगावच्या आर.सी.यु .चे उपकुलपती सी .एम. त्यागराज यांनी केले.

बेळगावच्या अकॅडमी ऑफ कॉम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलीजन आणि दिल्लीच्या द इंडियन काऊन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव डॉ. आर.डी. रानडे यांच्या, जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद बेळगावच्या हिंदवाडीतील के.एल.एस. के.के. वेणुगोपाल ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता .

मुख्य अतिथी म्हणून बेळगावच्या आर.सी.यु. .चे उपकुलपती सि.एम. त्यागराज उपस्थित होते. दिल्ली विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. बालगणपति देवरकोंड यांनी मार्गदर्शन केले. एसीपीआरचे अध्यक्ष अशोक पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या नेतृत्वाची जबाबदारी सचिव एम बी जीरली यांनी घेतली.

मुख्य अतिथी सि.एम. त्यागराज यांनी सांगितले की, “माणसासाठी काहीही शाश्वत नाही. फक्त कर्म आणि कीर्तीच शाश्वत आहे. माणसाने आधी स्वतःला काय आहे ते समजून घेतले पाहिजे. जीवनभर माणूस संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ध्यान आणि साधनांमुळे मिळणारी शांती अत्यंत महत्त्वाची आहे. भारतासह अनेक तत्त्वज्ञानीनी हे संदेश दिले आहेत. त्यांना समजून आत्मिक ज्ञान प्राप्त करणे महत्त्वाचे आहे.”

दिल्ली विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. बालगणपति देवरकोंड यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, “सतत ध्यान साधनेमुळे ध्यान सिद्धी प्राप्त होऊ शकते. आजच्या युवापिढीसाठी ध्यान आणि गुरुंचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या कार्यक्रमात विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: