Belagavi

ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी नेमणूक झालेल्या जिल्हा प्रतिनिधींचा सत्कार

Share

बेळगाव जिल्ह्यात ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या अनुसंगाने जिल्हातील् ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक प्रतिनिधी म्हणून श्री रविशंकर , सदस्य सुनीता बागेवाडी, मलिकार्जून कामतगी, यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कर्नाटक दलित संघर्ष आंबेटकर वाद यांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी समितीचे राज्य अध्यक्ष सिद्धाप्पा कांबळे उपस्थित होते.

सेवेतील त्रुटी, अनधिकृत दरवाढ, उत्पादनांची निकृष्टता तसेच ग्राहकांची फसवणूक यांसारख्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात “कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाची” स्थापना करण्यात आली आहे.

यामुळे या भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, त्यामुळे याचा लाभ होणार असल्याचे राज्य अध्यक्ष सिद्धाप्पा कांबळे यांनी सांगितले. यावेळी वकील चनप्पा बागेवाडी,भाऊ गडकरी, जाणबा कांबळे, महन्तेश तळवार, दीपक दबडे, तुकाराम कांबळे, संतोष तळवार आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: