मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून , कर्जदारांना त्रास देण्यात आल्यास , सरकार कडक कारवाई करण्यास सज्ज आहे, आणि पूर्वी दिल्या जाणाऱ्या 3 वर्षांच्या शिक्षेचा कालावधी आता 10 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृह मंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.
बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना, त्यांनी फाइनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा एकदा पुन्हा इशारा दिली. पूर्वी 3 वर्षे असलेल्या शिक्षेच्या कालावधीत वाढ करून आता ती 10 वर्षे केली गेली आहे. सरकारने कडक कायदेशीर पावले उचलली असून, राज्यपालांना संबंधित बिल पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.
दलित मंत्री लवकरच दिल्लीला जाणार असल्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, माझ्या नेतृत्वाखाली ते दिल्लीला जात आहेत, हे मला माहीत नाही मी माझ्या खात्याच्या कामासाठीच दिल्ली जात आहे,” असे ते म्हणाले.


Recent Comments