गावातील श्री महालक्ष्मी देवीच्या जत्रेचा महोत्सव येणाऱ्या मार्च महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवीला वर्णलेपन कार्यासाठी बणगारांच्या घरी पाठवण्यापूर्वी जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले..
बेळगाव तालुक्यातील हलगा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा जत्रा महोत्सव येणाऱ्या मार्च महिन्यात होणार आहे. यामुळे देवीला वर्णलेपन कार्यासाठी बणगारांच्या घरी पाठवण्यापूर्वी एकदिवसीय जत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. पारंपरिक वाद्यसंगीतासोबत गावातील प्रमुख मार्गांवरून गावातील सुवासिनींची मिरवणूक काढण्यात आली .

यावेळी माहिती देताना जत्रा महोत्सव समितीने सुमारे 11 वर्षानंतर ग्रामदेवीचा जत्रा महोत्सव मार्च महिन्यात होणार आहे. यामुळे आज वर्णलेपनासाठी बणगारांच्या घरी पाठवण्यापूर्वी एकदिवसीय जत्रा महोत्सव आयोजित केला. यापूर्वी देवीच्या ओटी भरण्यात आली . . आज अभिषेक कार्यक्रम पार पडला, असे त्यांनी सांगितले.
हलगा श्री महालक्ष्मीदेवी जत्रा महोत्सव 17 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. . देवीची मूर्ती रंगकामासाठी पाठवण्यापूर्वी एकदिवसीय जत्रा महोत्सव आयोजित केला आहे. देवी सर्व प्राणीमात्रांच्या कष्टांना दूर करून, समृद्धी आणि शांती प्रदान करून सन्मंगल घडवो, अशी प्रार्थना केली गेली
या कार्यक्रमात गावातील अनेक भाविक सहभागी झाले होते.


Recent Comments