Chikkodi

ड्रेनेजमध्ये पडलेल्या पाळीव कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Share

ड्रेनेजमध्ये पडलेल्या पाळीव कुत्र्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर वाचवले.

चिक्कोडी शहरातील गणेश नगर येथील ड्रेनेजमध्ये पाळीव कुत्रा पडला होता. ही बाब कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराची मोहीम राबवून , दोरी व प्लास्टिकच्या टोपलीच्या साहाय्याने कुत्र्याला जिवंत बाहेर काढून मालक नीरज कोहली याच्या ताब्यात दिले .

या कारवाईत आर.आर.पाटील, एम.एस.नदाफ, एम. एन. बिलावर, एम. जी. सनदी आणि इतर अग्निशमन दलाचे जवानही सहभागी झाले होते.

Tags: