नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी येथे आहे एक आनंदाची बातमी. सुझुकी ॲक्सिस 125 ही नवीन बाईक बेळगाव येथील माणिकबाग सुझुकी येथे लोकार्पण करण्यात आले असून आता पासूनच बुकिंग सुरू झाले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सुझुकी कंपनीने नवीन दुचाकी तयार केली आहे. सोमवारी संध्याकाळी बेळगाव येथील धारवाड रोडवरील माणिकबाग सुझुकी येथे नवीन सुझुकी ॲक्सिस 125 लोकार्पण करण्यात आले. बेळगावच्या गॅरेज ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार, मार्व्हलस बेळगावचे सीईओ राकेश, आदित्य इंगळे, गो मीडियाचे संस्थापक ऐश्वर्या, माणिकाबाग समूह संचालक भूषण मिराजी,
रमेश शहा, शाल मिर्जी, स्वप्नील शहा, सौरभ शहा, माणिकबाग सुझुकीचे व्यवस्थापक शैलेश खटावकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नवीन वाहनाचे अनावरण करण्यात आले.
सुझुकीने नवीन Axis 125 मध्ये अनेक नवनवीन शोध पाहायला मिळतात.बॉडीशेल, हेडलाइट्स आणि इंजिन फ्रेम वाढवल्या आहेत. आरामदायी सीट, पेट्रोल टाकी इग्निशनवर उघडते,5.8 लिटर पेट्रोल क्षमता, ड्युअल-कव्हर, मोबाईल चार्जर, डिजिटल डिस्प्लेवर नेव्हिगेशन, कॉलिंग फीचर, इव्हेंट डिस्प्ले, नोटिफिकेशन देण्यात आले आहे. सिंगल क्लच असलेल्या या वाहनाचा आवाजही खूप कमी आहे. हे वाहने 4-5 रंगात उपलब्ध आहेत.माणिकबाग सुझुकीचे व्यवस्थापक शैलेश खटावकर यांनी सांगितले की, फक्त 5 हजार रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर वाहन घरी नेता येते.
नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आजच बेळगाव येथील माणिकबाग सुझुकीच्या शोरूमला भेट द्या.
Recent Comments