बेळगाव जिल्हा रूग्णालयात बाळंतीण व नवजात शिशूंचे मरण प्रमाण कमी करण्यासाठी व रुग्णांना योग्य उपचार आणि सुविधा देण्याची मागणी करत सोशलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय शेतकरी आणि शेतमजूर संघटनेच्या वतीने आज बेळगावात आंदोलन करण्यात आले.
बेळगाव जिल्हा रूग्णालयात बाळंतीण व नवजात शिशूंचे मरण प्रमाण कमी करण्यासाठी व रुग्णांना योग्य उपचार आणि सुविधा देण्याची मागणी करत आज बेळगाव शहरामध्ये सोशलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय शेतकरी आणि शेतमजूर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बेळगाव जिल्हा रुग्णालयासह पीएचसी, तालुका रुग्णालये, बीआयएमएस यांचा दर्जा सुधारला पाहिजे.
नव्याने बांधण्यात आलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तातडीने सुरू करावे.जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात बेड्स व डॉक्टरांची संख्या वाढवावी. आवश्यक तेवढे कुशल डॉक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी आणि ड गटातील कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती करण्यात यावी. बीपीएल कार्डधारकांसह सर्व लोकांसाठी मोफत चिट्टी, स्कॅनिंग, रक्त तपासणी, शस्त्रक्रियाची सोय करावी. बेळगाव जिल्हा रुग्णालयात मनी पेमेंट व मेडिसिन काउंटरची संख्या वाढवावी. रुग्णालयात चांगल्या दर्जाचा औषधांचा पुरवठा यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोशलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडिया व अखिल भारतीय शेतकरी व शेतमजूर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गोरगरीब जनतेला आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे लोकांची अडचण होत आहे.बेळगाव जिल्हा रुग्णालयात गरोदर महिला आणि नवजात बालकांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. योग्य उपचार आणि औषधोपचार व्यवस्थेशिवाय हे मृत्यू होत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लक्ष केंद्रित करावे.महिनाभरात प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा रामांजनेनेयाप्पा आल्दळ्ळी यांनी दिला.
याप्रसंगी सोशलिस्ट युनिट सेंटर ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय रायठा कृषी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Recent Comments