बेळगाव येथील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केएलई रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक करून ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यू.एस. आवटी यांनी त्यांच्या पथकासह आंबेडकरगल्ली, काकती येथील मोहम्मद शाहिद अब्दुल हमीद मुल्ला यांचा शोध घेतला आहे. केएलई रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या दुचाकी हा चोरत होता. सुमारे 1,12,000 रुपये किमतीच्या दोन हिरो होंडा स्पेंडर, एक होंडा ॲक्टिव्हा, एक बजाज डिस्कव्हर अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पीएसआय त्रिवेणी नाटीकार, एस.आर. मुत्तत्ती , बी.के. मिटगार, एएसआय बसवराज नरगुंद, खादर साब खानम्मनवर, गोविंदप्पा पुजार, रमेश अक्की, महादेव, बशिद आदींनी सहभाग घेतला होता.


Recent Comments