Belagavi

बेळगावात निर्माण होणार उड्डाणपूल व रिंगरोड

Share

अर्थसंकल्पात बेळगाव शहरातील उड्डाणपूल व रिंगरोडच्या बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली.

जिल्हा प्रभारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी फ्लाय ओव्हर आणि रिंगरोडच्या निळ्या नकाशाचा आढावा घेतले आणि इतर कोणती क्षेत्रे जोडता येतील यावर चर्चा केली.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन आदी उपस्थित होते.

Tags: