Banglore

ईडीची चौकशी राजकीय हेतूने प्रेरित ..माझे नाव बदनाम करण्याचे हे सर्व प्रयत्न यात भाजपला यश येणार नाही; सीएम सिद्धरामय्या

Share

ईडीचा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सर्वश्रुत आहे. माझे नाव खराब करण्याचा भाजपचा या मागचे डाव आहे. त्यात भाजपला यश येणार नाही. मुडा प्रकरणात आमच्या कुटुंबाने काहीही चुकीचे केलेले नाही असे सीएम सिद्धरामय्या म्हणाले.

नंजनगुडू तालुक्यातील सुत्तुर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, मुडा प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थागितीचा आदेश जारी केला आहे. याचा अर्थ ते कायदेशीर नाही. बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित होत असेल तर न्यायालयाने तो बंद पाडला असता. माझे नाव बदनाम करण्याचे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. ईडीने तपास अहवाल जाहीर केला नाही. केवळ जप्तीचा अहवाल जारी केला आहे. बाइट

ईडीचा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे माझ्या बाबतीत बोलण्यासारखे काहीच नाही. ते या प्रकरणावरून माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यात भाजपला यश येणार नाही. ते म्हणाले की, मुडाच्या प्रकरणात आमच्या कुटुंबाने काहीही चूक केलेली नाही. बाइट

मंत्री सतीश जारकीहोळी आणि जी.परमेश्वर यांच्या बैठकी संबंधी विचारलेल्या प्रश्नाला ते म्हणाले की, यात अटकळ करण्यासारखे काही नाही. बाइट

Tags: