राज्यात मायक्रो फायनान्सच्या छळाला कंटाळून लोक आपली गावे सोडून जात आहेत आणि काही लोकांना जीव गमवावा लागत आहे.त्यामुळे मायक्रो फायनान्सच्या छळाला आळा घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र याच दरम्यान छोटी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुबळीमध्ये फायनान्सच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

रुग्णालयाच्या बेडवर असलेल्या या माणसाचे नाव माबाली असून कमरीपेटचा तो रहिवासी आहे. त्याने चार वर्षांपूर्वी विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते.तसेच कर्ज ही फेडायचा मात्र गेल्या तीन महिन्यांपासून गैरसोय झाल्याने कर्जाची परतफेड झालेली नाही. त्यामुळे घरात येऊन पैशाची मागणी करत मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी छळ सुरू केला. यामुळे माबुलीने बुधवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच आयुक्त एन शशिकुमार यांनी किम्स हॉस्पिटल आणि माबुलीच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांकडून माहिती घेतली. त्याशिवाय त्यांना त्रास देणाऱ्या फायनान्सविरुद्ध कमरीपेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राज्यात फायनान्सच्या छळामुळे आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. सीएम सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींना मायक्रो फायनान्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त शशीकुमार यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कंपनीच्या प्रमुखांची बैठक झाली.
लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फायनान्सवर कोणते अंकुश लावले जातील, याची प्रतीक्षा करावी लागेल.
Recent Comments