बेळगाव तालुक्यातील अगसगा गावच्या हद्दीत दुचाकीला टिप्परची धडक दिल्याने दुचाकीचे दोन तुकडे होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बेळगाव तालुक्यातील अगसगा गावाच्या हद्दीत एका दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावातील योगेश नावी (२४) आणि नितेश तरळे (२७) अशी मृतांची नावे आहेत.वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या टिप्परची धडक होऊन दुचाकीचे दोन तुकडे झाले. दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे झाले असून अपघातानंतर टिप्पर चालक वाहन सोडून पळून गेला आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Recent Comments