Belagavi

हु – धा शहरातील औद्योगिक वसाहतींना हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा

Share

बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणी पुरवठा करण्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या आमचे पाणी आमचा हक्क आंदोलनाच्या पूर्वसभेत बेळगावच्या जनतेने हे धोरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणीपुरवठा करणाऱ्या धोरणाच्याविरोधात बेळगावच्या मारुतीगल्ली येथील श्री मारुती मंदिरात आमचे पाणी आमचा हक्क आंदोलन पूर्वतयारी बैठक बोलविण्यात आली होती. कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजींच्या दिव्य उपस्थितीत झालेल्या सभेच्या प्रारंभी माजी जिल्हा प्रभारी मंत्री शशिकांत नाईक यांनी हिडकल धरणातून हुबळी धारवाडला पाणीपुरवठा करताना उद्भवणारी समस्या सभेच्या निदर्शनास आणून दिली. हिडकल धरणाचे पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्रापर्यंत नेणे बेळगावसाठी चांगले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

माजी महापौर व माजी आमदार रमेश कुडची म्हणाले की, डीसीएम डीके शिवकुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला नसताना काम कसे सुरू केले? हे आमच्या जिल्ह्याच्या मंत्र्यांच्या लक्षात आले नाही का? लोकहिताचा पर्वा न करता हिडकल जलाशयाच्या पाण्याचा गैरवापर होत आहे.या पाण्याचा वापर शेतकरी व जनतेने केला तरच हा प्रकल्प यशस्वी होईल. केवळ उद्योगांसाठी पाणी देऊन उपयोग नाही. अपक्षरित्या सर्वांनी याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिलीपा कामत म्हणाले कि, बेळगावचे खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत. यात काही तर गूढ आहे. जनतेला विश्वासात घेऊन कामे होऊ शकत नाहीत म्हणून जनतेला अंधारात ठेवून कामे केली जात आहेत. येथील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना येथे जनतेला व
येथील औद्योगिक क्षेत्राला पाण्याची कमतरता असल्याचे माहीत आहे. त्यामुळे त्यांनी या कामाला विरोध करायला हवा से म्हणाले. बाइट

दलित नेते मल्लेश चौघुले म्हणाले की, बेळगावातील जनजनावरांना पाण्याची टंचाई निर्माण होईल. एकजुटीने या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दीपक वागेला म्हणाले कि, दिवंगत बंगारप्पा मुख्यमंत्री असताना बेळगावचे महापौर स्वर्गीय संभाजीराव पाटील आणि रमेश कुडची यांनी हिडकळ जलाशयातून बेळगावसाठी पाणी आणले. हा बेळगावकरांचा हक्क आहे. पाणी देण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र, आमच्याकडे टंचाई निर्माण करून इतरांना पाणी देणे योग्य नाही.

जागतिक लिंगायत महासभेचे नेते बसवराज रोट्टी यांनी यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद म्हणाले की, बेळगावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या होऊ नये. या संदर्भात आज प्रत्येकजण पक्ष-भाषेचा विचार न करता आवाज उठवत आहे. या प्रकल्पाबाबत जिल्ह्याचे प्रभारी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती न देता हा निर्णय घेण्यात आला, हे दुर्दैवी आहे. मंत्री एम.बी. पाटील यांना हिप्परगी जलाशयातून औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात यावा असे म्हणाले.

आता कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले कि हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला हिडकळ धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा. सरकारने सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी. या प्रकल्पाचा फायदा उद्योजकांना होऊ शकतो मात्र बेळगाव शहराला यामुळे पाण्याची समस्या भेडसावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्ह्यातील विविध धर्मगुरू, उद्योगपती, कन्नड समर्थक, सामाजिक कार्यकर्ते, विविध दलित संघटना, बेळगाव इनोव्हेशन फेडरेशन, शेतकरी संघटना, बेळगाव बार असोसिएशन, पर्यावरणवादी आदींची उपस्थिती होती

Tags: