मायक्रो फायनान्सच्या छळामुळे होणाऱ्या आत्महत्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कडक कायदा लागू केला असतानाही मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून बेळगावात आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
मायक्रो फायनान्सच्या छळामुळे होणाऱ्या आत्महत्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कडक कायदा लागू केला असतानाही मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील रफीक थिगडी (३८) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी मायक्रो फायनान्सकडून 6 लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी घरी आलेल्या फायनान्स कर्मचाऱ्यांनी त्यांना नाहक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. बैलहोंगल स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भेट देऊन तपास केला आहे.
Recent Comments