पर्यावरण जनजागृती मोहिमेच्या उद्देशाने म्हैसूरचे शेतकरी आणि पर्यावरणवादी पी मंजुनाथ यांनी म्हैसूर ते अयोध्या सायकल प्रवास सुरू केला असून मंगळवारी बेळगाव गाठले.
पी मंजुनाथ मुळात शेतकरी आणि पर्यावरणप्रेमीं असून मले महाडेश्वर टेकड्या आणि चामुंडी टेकड्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली आहे. या भागात पर्यावरण रक्षणासाठी टास्क फोर्स तयार करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. पर्यावरण रक्षणासाठी म्हैसूर ते अयोध्या सायकल प्रवास करून के.आर.टाऊन बडवा येथील शिमोग्गा हावेरी आणि सौदत्ती क्षेत्र येथे जाऊन यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ऐतिहासिक चन्नम्माच्या कित्तूर येथे आले आणि मंगळवारी सायकल जथ्याद्वारे बेळगावात आले. या वेळी त्यांनी आपली मराठीला अधिक माहिती दिली .


Recent Comments