अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेतर्फे रुग्णांची सुश्रुषा करून जपलीस सामाजिक बांधिलकी
बेळगाव तारीख 25 जानेवारी 2025 : सामाजिक बांधिलकी जपणारे काही संस्था काही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये अखिल भारतीय प्रगतशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशिय संस्था बेळगाव कर्नाटक शाखेच्या वतीने अपघात झालेल्या रुग्णांची वेळोवेळी सुश्रुषा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे हा आदर्श प्रत्येक संस्थांनी आणि व्यक्तींनी घ्यायला हवा असे कार्य त्यांनी कार्य केले आहे.
यमकनमर्डी येथील झालेल्या टेम्पो अपघात मध्ये 45 लोक जखमी झाले होते. त्या अपघातामध्ये काही लोकांना जास्त दुखापत झाली असून काही रुग्ण तिचे व्यवस्थित आहेत. 24 जानेवारी 2025 रोजी 16 रुग्णांना तर 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता आठ रुग्णांना बेळगाव जिल्हा रुग्णालयातून अपघातात झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले काहींची तब्येत अतिशय चांगली असून काही रुग्ण दोन दिवसांमध्ये त्यांनाही रिचार्ज करण्यात येतील असे तज्ञ डॉक्टरांनी सांगण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव कर्नाटक जिल्हा शाखेच्या वतीने तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटबंधारे मंत्री श्री सतीश जाळकेहोळी यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार बेळगाव जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची सेवा करण्यासाठी या संस्थेने अतिशय मोठे परिश्रम घेतलेले आहेत यासह बेळगाव येथील विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन बेळगाव जिल्हा रुग्णालयातील अपघातामध्ये झालेल्या जखमी रुग्णांची सेवा करण्यासाठी अतिशय मोठे परिश्रम घेतलेले आहेत; या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी गेल्या चार ते पाच दिवसापासून अतिशय काळजीपूर्वक रुग्णांची सुश्रुषा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य या संस्थेने केलेले आहे.
24 जानेवारी 2025 रोजी 16 रुग्णांना तर 25 जानेवारी 2024 रोजी आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. के एल ई हॉस्पिटल बेळगाव येथे अजून 02 रुग्ण आहेत. केएमसी हुबळी हॉस्पिटल मध्ये 03 रुग्ण आहेत; आणि बेळगाव जिल्हा रुग्णालय मध्ये अजून 09 रुग्ण असून एकूण 14 रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून त्यांची तब्येत चांगली झाली आहे असा अंदाज तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माहिती देण्यात आली; अजून काही रुग्ण वेगवेगळ्या विविध ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून तेही लवकर बरे होतील असे सांगण्यात आले.
यावेळी एपीएमसी चे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, परिषदेचे अध्यक्ष समाजसेवक श्रीधर पाटील, समाजसेवक कवी. प्रा. निलेश शिंदे, मारुती बडीगेर डॉ. गजानन वर्पे , बाळू कुरबर प्रथमेश सावंत केपीसीसी चे सदस्य मलगौडा पाटील आणि अरविंद कार्ची, प्रा विशाल करबळकर, यमकन मर्डी येथील किरण सिंग राजपूत गुलाब सिंग राजपूत फजल मकानदार शिवशंकर झुटी गिरीश मिश्र कोटी ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ कांबळे माजी नगरसेवक अनिल पाटील माजी महापौर शिवाजी सुंठकर, लक्ष्मण गौंडवाडकर यल्लाप्पा पाटील, सदानंद पालकर यांनी वेळोवेळी रुग्णांची सुश्रुषा केली.
अनेक मान्यवरांनी दिल्या भेटी
बेळगाव जिल्हा पंचायत चे सी ई ओ राहुल शिंदे, बेळगाव जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन, डीएसपी मार्टिन सर, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटबंधारे मंत्री सतीश जारकीहोळी, विधानपरिषद सदस्य यादव, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू सूनगार, बुडाध्यक्ष लक्ष्मण चिंगळी, बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे डायरेक्टर अशोक शेट्टी, डिस्टिक सर्जन प्रा डॉ विठ्ठल शिंदे, मेडिकल सुपर प्रा डॉ इराण पल्लेद, प्रभारी डिस्ट्रिक्ट सर्जन प्रा डॉ सुधाकर, सर्जन प्रा डॉ. गिरीश दंडगी, ऑर्थोपेडिक सर्जन प्रा . डॉ. प्रकाश वाली, प्रा डॉ एम एन पाटील , डॉ कविता पटनशेट्टी यासह बेळगाव जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींनी अपघात झालेल्या रुग्णांना भेटून सांत्वन केले.
बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयातील अपघात झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर इमर्जन्सी समोर उभे असलेले रुग्ण. बाजूला श्रीधर पाटील प्रथमेश सावंत , मारुती बडीगेर, प्रा. निलेश शिंदे, किरणसिंग राजपूत, गुलाबसिंग रजपूत, मंजुनाथ कांबळे, फजल मकानदार आणि इतर
Recent Comments