Belagavi

इन न्यूज मराठीच्या मनीषा संनायक यांना राज्य निवेदिता पुरस्कार

Share

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाऊंडेशन आणि एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन्सतर्फे आयोजित राष्ट्रीय कला आणि संस्कृती संमेलनात आमच्या इन न्यूज मराठीच्या निवेदिका मनीषा संनायक यांना राज्य निवेदिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जीवन संघर्ष फाऊंडेशन आणि एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कला आणि संस्कृती परिषद ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .आमच्या इन न्यूज मराठीच्या निवेदिका मनीषा संनायक यांना मान्यवरांच्या हस्ते राज्य निवेदिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags: