सेवा भारती ट्रस्टच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून मातृ शक्ती वंदना मातृ संगम कार्यक्रम 18 जानेवारी रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, अनगोळ येथे साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रघु आकमंची यांनी दिली .
शुक्रवारी बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेवा कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून आपण खूप बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे आमचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मातृशक्ती वंदना मातृ संगम कार्यक्रमाचे उद्घाटन रेणू पाठक करणार असल्याचे स्फुर्ती अंगडी पाटील यांनी सांगितले. व्हीटीयूचे कुलपती डॉ. एस. विद्याशंकर, विवेक कमलानी, बसवराज देशमुख हे अतिथी म्हणून येणार असल्याचे त्यांनी सांगितले, रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार जगदीश शेट्टर, केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे उपस्थित राहणार आहेत.
एच.डी.पाटील आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
Recent Comments