Belagavi

निमंत्रित जलतरण स्पर्धेत आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लब सदस्यांची उत्कृष्ट कामगिरी

Share

आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबने निमंत्रित जलतरण स्पर्धेत चांगली कामगिरी केली.

आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जेएनएमसी सुवर्ण आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, बेळगाव येथे आयोजित केलेल्या निमंत्रित जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह उपविजेतेपद पटकावले. अद्वैत जोशीने वैयक्तिक विजेतेपद पटकावत पाच गटांत सात पदके जिंकली. या स्पर्धेत विविध राज्यातील अनेक जलतरणपटू सहभागी झाले होते.

आबा अँड हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजित पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, मारुती घाडी, किशोर पाटील, कल्लाप्पा पाटील, भरत पाटील, विशाल वेसने, विजय नाईक, प्रसाद दरवंदर, निखिल बेकाने, प्रांजल सुलतान, ओमनाथ पाटील आदींनी सहभाग घेतला. घाडी, विजय भोगण, चंद्रकांत बेळगोजी या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच क्लबचे पदाधिकारी ॲडव्होकेट मोहन सप्रे, शीतल हुलबत्ते, अरविंद संगोळी , शुभांगी मंगलोरकर यांनी प्रोत्साहन दिले.

Tags: