आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्याबरोबरच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका थांबवून मारहाण करण्यात आल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे .
बेळगाव तालुक्यातील सुळगा गावातील विजय परशुराम चव्हाण (३३) याला मारहाण करण्यात आली. बिम्स हॉस्पिटलमध्ये तो आपल्या जीवाशी झुंज देत आहे . सुनील अरवणसोबत त्याचे आर्थिक व्यवहार होते. याच कारणावरून त्याने आदल्या रात्री सुलगा गावात विजय परशुराम चव्हाणवर हल्ला केला. त्यानंतर गोल्फ कोर्सजवळून जात असलेल्या रुग्णवाहिकेला थांबवून त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली.
KA 51 G 5145 क्रमांकाची रुग्णवाहिका अडवून हल्ला केल्याची घटना काकती आणि एपीएमसी पोलीस ठाण्यात घडली आहे.


Recent Comments