काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी कार अपघातात जखमी झालेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळी जखमी झाले असून, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर बेळगाव येथील विजया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी काल संध्याकाळी रुग्णालयात जाऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर आदी उपस्थित होते .


Recent Comments