सुका व कच्चा कचरा वेगळा करून तो महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर आज बेळगावच्या वॉर्ड क्रमांक 29 मधील इंद्रप्रस्थ नगर येथील गणेशबाग अपार्टमेंटमध्ये सुक्या आणि कच्च्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या डस्टबिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
या संदर्भात नगर सेवक नितीन जाधव यांनी , सुका व कच्चा कचरा वेगवेगळा करून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवणे , इंद्रप्रस्थनगर येथील गणेशबाग अपार्टमेंटच्या लोकांना बंधनकारक केले असून सुका व कच्चा कचरा वेगवेगळा ठेवला आहे. महानगरपालिका सह आणि इतरांसाठी एक आदर्श आहे. म्हैसूर मॉडेलप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

क्षेत्र निरीक्षक अनिल बोरगावे यांनी नगर सेवक नितीन जाधव यांच्या सहकार्याने सुका व ओला कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करून त्याची आज अंमलबजावणी केली. गणेश बाग अपार्टमेंटने ही प्रणाली स्वीकारली असून ती प्रशंसनीय असल्याचे सांगून कचऱ्याच्या विल्हेवाटबाबत अधिक माहिती दिली.
यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आसावरी भोकरे, खजिनदार राजेंद्र हुईलगोल, माजी अध्यक्षा चिदंबर मुनवल्ली, कार्यकारिणी सदस्य सुनीता रेड्डी, विद्या राणे, मीना मालगावे, मयुर नवनाळे आदींचा सहभाग होता.


Recent Comments