बेळगावातील हिडकल जलाशयातून हुबळी येथील धारवाडच्या उद्योगांना पाणी दिल्यास आपण तीव्र संघर्ष करू, असा इशाराही कर्नाटक शेतकरी संघटना आणि हरित सेनेने दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले. बेळगावच्या हिडकल जलाशयातील पाणी हुबळी धारवाडला औद्योगिक कारणासाठी नेले जात असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. दहा तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यासाठी आम्ही अनेकदा लढा दिला असून आमच्या भागातील जनतेचे खूप हाल होत असून कोणत्याही कारणास्तव या उद्योगांना पाण्याचा एक थेंबही देता काम नये .
एकही शेतकरी पाईप लाईन टाकू देणार नाही, तात्काळ जिल्हा प्रभारी, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकारी , तालुका अधिकारी यांनी हे काम त्वरित थांबवावे. अन्यथा आगामी काळात शेतकरी संघटना हरित सेना हजारोंच्या संख्येने कर्नाटक राज्यव्यापी उग्र आंदोलन करेल, असा इशारा चुनप्पा पुजारी यांनी दिला.
यावेळी चुनप्पा पुजारी , संजू हुवण्णावर किशन नंदी, जगदीश देवरेड्डी आणि कर्नाटक राज्य शेतकरी संघ हरित सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .


Recent Comments