कागवाड : कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याचे उद्योगपती दिवंगत विनायकराव शिरगावकर यांचा 29 वा व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न झाला. सतत सहा दिवस तज्ञ व त्यांचे कार्यक्रम संपन्न झाले.
उगार येथील विहार सभाभवन येथे 6 जानेवारी ते 12 जानेवारी अखेर व्याख्यानमानाचे कार्यक्रम संपन्न झाले.
उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती राधिकाताई शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली व्याख्यानमालाचे कार्यक्रम घेण्यात आले.

सुप्रसिद्ध बाळ रोग तज्ञ डॉक्टर राजीव रेडेकर यांनी बालरोग विषयी माझा अनुभव या विषयावर व्याख्यान केले, दुसरे व्याख्यान मिरज येथील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर जी एस कुलकर्णी यांनी आनंदी व निरोगी जीवनाचे रहस्य या विषयावर व्याख्याने केले. सामाजिक कार्यकर्त्या कुंदन बावनकर घाडगे यांनी सामाजिक उद्योगाकडे माझा प्रवास या विषयावर व्याख्यान केले. भारतीय शिक्षण व्यवस्था माणुसकी घडू शकते का या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या विशाखा आपटे यांनी विचार मांडले. आर्थिक नियोजन बदलत्या काळाची गरज या विषयावर आर्थिक तज्ञ अजिंक्य जगोजे यांनी विचार मांडले लोकशाही अहिल्या होळकर यांच्या विषयी प्राध्यापिका अनघा नंदकुमार बडबडे यांनी सविस्तर विचार मांडले.
रविवारी 12 रोजी मिरज येथील वाल्हेस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निथॉन यल ससे यांनी स्मृतीभष्ंय भविष्यातील एक समस्या या विषयावर सखोल व्याख्यान मांडले. त्यांनी बोलताना म्हणाले सध्याच्या घडीला पुरुषांचे 57 वर्षे महिलांचे 53 वर्षे नंतर थोडाफार मेंदूला विसर पडतो या आजाराला प्रारंभ होते मनुष्याचे वय वाढत गेल्यानंतर हा आजार दिसतो सध्याच्या घडीला जगात अडीच कोटी पर्यंत स्मृती विसर हा आजार जाणवतो भविष्यात 2040 पर्यंत आठ कोटी पर्यंत याचे रुग्ण आढळतील असा दावा डॉक्टर ससे यांनी केला आहे. प्रत्येकाने मन शांत ठेवून या रोगावर काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
उगार महिला मंडळाचे अध्यक्ष राधिकाताई शिरगावकर यांनी विनायक शिरगावकर स्मृती व्याख्यानमाला याविषयी बोलताना म्हणाले गेल्या 29 वर्षापासून सतत व्याख्यानमाला आयोजित करून येतील महिला मंडळाच्या वतीने इतरांना अनेक विषयी माहिती मिळवून देणे त्यांच्या समस्या जाणून घेणे या प्रकारे सेवा करण्यात आले आहे सहा दिवसात अनेक तज्ञांनी येऊन आपले विचार मांडले याला येथील महिला मंडळाच्या सदस्यांनी व नागरिकांनी साथ दिला असे त्या सांगितले.
शिरगावकर महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच महिला मंडळाच्या सदस्या मेघना कुलकर्णी यांनी सहा दिवसाच्या या कार्यक्रमाविषयी तसेच व्याख्यान करा विषयी सविस्तर माहिती दिल्या. या कार्यक्रमांमध्ये उगार साखर कारखान्याचे उद्योगपती प्रफुल शिरगावकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शिरगावकर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सोहन शिरगावकर, उगार महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ गीताली चंदन शिरगावकर सौ लक्ष्मी सोहन शिरगावकर, सौ गौरी सचिन शिरगावकर सह महिला मंडळाच्या सदस्या यांची उपस्थिती होती मंडळाच्या सेक्रेटरी सौ नेहा पतकी यांनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केले.
सुकुमार बनुरे
इन न्यूज कागवाड
Recent Comments