मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रवास करत असलेल्या कार अपघाताची बातमी समजल्यानंतर गृहमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल यांना फोन गृहमंत्री डॉ.जी. परमेश्वर यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना चांगल्या उपचाराची विनंती केली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टीजवळ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांचे भाऊ ज्या कारमधून प्रवास करत होते त्या गाडीला अपघात झाला, सुदैवाने हेब्बाळकर आणि भाऊ सुखरूप बचावले.
या कार अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीच्या हाडाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. त्यांच्यावर बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मणक्याच्या L1 L4 हाडात जोरदार फटका बसल्याने , दुखापत झाली आहे .त्यामुळे आम्ही उपचार करत आहोत. ते म्हणाले की, डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्या लवकरच बऱ्या होतील .


Recent Comments