मुलीला संक्रांतीची भेट देण्यास आलेल्या सासूचा कन्येच्या जावयाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना बेळगाव येथील वडगावमधील कल्याण नगर येथे घडली.
रेणुका श्रीधर पदुमुखे (वय 44, रा. कल्याण नगर, वडगाव, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा जावई , शुभम दत्ता बिर्जे (वय 24, रा. मलप्रभा नगर) याने त्यांना भोसकून खून केला आहे . . तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले मुलगी छाया आणि जावई शुभम हे सध्या वडगाव येथील रयत गल्ली येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. आज आई रेणुका , आपल्या मुलीला आणि जावयाला संक्रांतीच्या भेटवस्तू देण्यासाठी आल्या होत्या, यावेळी जावई शुभम याने, आमच्या घरी का आला, अशी विचारणा केली. या शाब्दिक भांडणाचे अनर्थात रूपांतर झाले आणि शुभम बिर्जे याने सासूवर चाकूने वार केले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रेणुका याना , बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार अपयशी ठरल्याने, रेणुकाचा मृत्यू झाला.
डीसीपी रोहन जगदीश, सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. बेळगाव शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments