Belagavi

दिल्ली आंदोलनातील शेतकरी आंदोलकांना दिलेले वचन पूर्ण करण्याची पंतप्रधानांकडे भारतीय कृषक समाजाची मागणी

Share

2021 मध्ये दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. भारतीय कृषक समाजाने आज पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे दाद मागितली असून आजपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही.

भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी सांगितले कि , २०२१ मध्ये दिल्लीत ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाले. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांनी अद्याप लक्ष न दिल्याने गेल्या ४८ दिवसांपासून ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते जगदीश सिंग बिलावल यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे.

78 वर्षीय जगदीश सिंह यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आता त्यांचे प्राण सरकारने वाचवावेत आणि लवकरच पंतप्रधानांनी मध्यस्थी करून सरकारला पत्र लिहून आश्वासन दिले पाहिजे. अन्यथा आगामी काळात संपूर्ण आशिया खंडात तीव्र आंदोलन करण्यात होईल, असा इशारा सिद्दगौडा मोदगी यांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन पत्र सादर करण्यात आले

Tags: