बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी जखमी झाले.
सोमवारी बेंगळुरू येथे झालेल्या सीएलपीच्या बैठकीनंतर बेळगावला परतत असताना जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ, गाडीसमोर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून पलटी होऊन एका झाडावर आदळली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे जखमी झाले.
जखमी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर बेळगावच्या विजया हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचार देण्यात येत असल्याचे डॉ. रवी पाटील म्हणाले.
ही घटना कित्तूर पोलीस ठाण्यांतर्गत अंबडगट्टी क्रॉसजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेंगळुरूहून बेळगावकडे येत असताना, कारसमोर आडवा आलेल्या कुत्र्याला वाचवताना , कारवरील नियंत्रण सुटून सर्व्हिस रोडजवळील झाडावर आदळली. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली .
युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले कि , काही कामासाठी विमानाने न जाता कारने बेळगावात येत असताना हा अपघात झाला. दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, देवाचा आशीर्वाद आणि परिसरातील जनतेच्या कृपेने आपण मोठ्या संकटातून वाचलो आहोत .
युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, यांनी मंत्री हेब्बाळकर यांची भेट दिली, घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्यावर यापूर्वीच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे . असे ते म्हणाले .
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गाडीला अपघात झाल्याने बेळगावातील पक्षनिरपेक्ष राजकारणी , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांच्यावर चांगले उपचार केले आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. घाबरण्याची गरज नाही. येथे कोणीही येऊन त्रास देऊ नये, असे ते म्हणाले.


Recent Comments