Vijayapura

सरकारने नक्षलवाद्यांसमोर शरणागती पत्करली : एमएलसी सी टी रवी यांचा आरोप

Share

राज्यात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबाबत विधान परिषद सदस्य सी टी रवी यांनी सरकारच नक्षलवाद्यांना शरण आल्याचा आरोप केला

विजयपूर शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी नक्षलवाद्यांनी सरकारवर शर्ती ठेवलेल्या आहेत असे सांगितले. ते म्हणाले की, शरणागती कोणाची आहे? नक्षलवाद्यांची की सरकारची? मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मवाळ मार्गावर शहरी नक्षलवादी अवलंबून आहेत. शहरी नक्षलवादी नक्षलवाद्यांवर नजर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नक्षलवाद्यांना कोण मदत करत होते? शस्त्रे कोण पुरवत होते आणि आत्मसमर्पण करण्याचे कारण काय होते? नक्षल आत्मसमर्पण प्रसंगाचा गैरवापर होत आहे का ? या नक्षलवाद्यांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली

काँग्रेसवर टीका करत सी.टी. रवी म्हणाले की, राज्यात काँग्रेसने सत्तेवर येऊन अडीच वर्षं झाली आहेत. त्यांचे काय यश? केवळ किमती वाढवल्या आणि भ्रष्टाचार वाढवला, अशी टीका त्यांनी केली. मूडा, वाल्मीकी, तसेच अबकारी घोटाळा , आरोग्य खात्यातील अनारोग्य, बालकांचा मृत्यू, जीवन रक्षक औषधांचा दर्जा घसरलेला हे धक्कादायक आहे, असे ते म्हणाले. प्रामाणिक अधिकारी आत्महत्या करत आहेत आणि सरकारी कर्मचारी, ठेकेदार आत्महत्या करत आहेत, अशी गंभीर टीका त्यांनी केली.

Tags: