Dharwad

हुबळी धारवाड बंदचा गरिबांना फटका : बाईकवरून नाष्टा विकणाऱ्या व्यक्तीशी गैरवर्तन

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी दलित संघटनांनी गुरुवारी हुबळी धारवाड बंद पुकारला होता. मात्र, बंदच्या काळात बाईकवरून नाश्ता विकत असलेल्या गरीब विक्रेत्याला दलित संघटनेच्या एका नेत्याने दिलेल्या वागणुकीचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्या प्रकरणी दलित संघटनांनी हुबळी धारवाड शहरांमध्ये बंद पुकारून आंदोलन केले. मात्र, त्याच वेळी धारवाडच्या श्री नगरमध्ये एक गरीब विक्रेता , बाईकवर नाश्ता विकत असताना त्याच्या थोबाडीत मारून , जबरदस्तीने त्याची विक्री बंद करण्यात आली . हुबळी धारवाडचे पोलीस कमिशनर म्हणतात की जबरदस्तीच्या बंदला त्यांनी परवानगी दिली नाही. पण त्याच दलित संघटनेने गरीब व्यापाऱ्यावर हल्ला करून बंद करायला भाग पाडले. यावर कायदेशीर कारवाई कधी होईल, असा प्रश्न धारवाडचे सजग नागरिक आता विचारत आहेत.

Tags: