भारतीय इतिहासाचे ज्ञान देण्याचे कार्य डाक विभागाने केले आहे. इतिहास जाणणारेच इतिहास निर्माण करू शकतात असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले.

बेळगावच्या टपाल विभागाच्या वतीने बेळगावचा इतिहास आणि वारसा दर्शविणाऱ्या पोस्ट कार्ड आणि स्टॅम्प्सच्या प्रदर्शनानिमित्त बेळगावच्या इतिहास आणि परंपरेचे दर्शन घडवणारे विशेष पोस्टकार्ड्स आणि स्टॅम्प्स जारी करण्यात आले. समारंभाचे दिव्य सान्निध्य जगद्गुरु डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामीजी आणि नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री डॉ. अल्लमप्रभु महास्वामीजी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, एम.एल.आय.आर.सी उप कमांडेंट कर्नल चंद्रनील रामनाथकर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले की, आज गोकाक धबधबा, अभियंता एस.जी. बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री यांसह अनेक पोस्ट कार्ड आणि स्टॅम्प्स जारी करण्यात आले आहेत. डाक विभाग गेल्या काही वर्षांपासून इतिहास, सांस्कृतिक ठिकाणे, संगीत, साहित्य आणि इतर क्षेत्रातील योगदान दर्शवणारी महत्त्वाची कामे करत आहे. इतिहास जाणूनच इतिहास निर्माण करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कित्तूर चेनम्मा यांच्या 100 व्या विजय महोत्सवाला डाक विभागाच्या विशेष तिकिटाचे त्वरित प्रकाशन करून त्यांचे कौतुक केले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या प्रयत्नांनी केवळ 18 दिवसांत या टिकेट्सची प्रकाशित करण्यात आली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेतील राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकोत्तर महोत्सवासाठी डाक विभागाने विशेष स्टॅम्प्स जारी केले आहेत, जी 21 जानेवारीला प्रकाशित होतील . हे पोस्ट स्टॅम्प्स इतिहास दर्शवतात आणि त्यांना संकलित करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करायला हवे, असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमात पोस्ट बॉक्सवरील कार्टून देखील मुलांची आकर्षण केंद्र ठरली. पोस्ट अधीक्षक विजय वडोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात व्यंकटेश बदामी, रमेश कामटे, आप्पासाहेब दड्डीकर, जयशील नारायण शेट्टी आदी अतिथी म्हणून उपस्थित होते.


Recent Comments