बेळगावच्या , जी.एस.एस. कॉलेजच्या बी.एस्सी. आणि बी.सी.ए. पहिल्या सेमिस्टरचा निकाल आज सकाळी वेळेवर जाहीर झाला आहे, आणि आजपासून दुसऱ्या सेमिस्टरच्या वर्गांची सुरूवात करण्यात आली आहे.
व्हॉइस ओव्हर : कॉलेजच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्य माधुरी शानभाग यांनी वेबसाइटद्वारे निकाल जाहीर केला.
यानंतर पत्रकार परिषद घेऊन बोलताना जी.एस.एस. कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी सांगितले की, विश्वविद्यालय अनुदान आयोग, नवी दिल्लीने एस.के.ई. संस्थेच्या जी.एस.एस. महाविद्यालयाला 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी स्वायत्तता दिली आहे. त्यानुसार, यूजीसीच्या सर्व नियमांचे पालन करत बी.एस्सी. आणि बी.सी.ए. चे पहिले सेमिस्टर 15 जुलै 2024 पासून शैक्षणिक वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आले होते.
योग्य नियोजनासह सेमिस्टरच्या अखेरच्या परीक्षा आणि मूल्यांकन प्रक्रिया फक्त चार आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली. पारदर्शकतेला राखण्यासाठी कॉलेजने आंतरिक आणि बाह्य मूल्यांकन पद्धती अंमलात आणल्या आहेत. निश्चित वेळेत सहा महिन्यांत एक सेमिस्टर पूर्ण करत, दुसऱ्या सेमिस्टरच्या बी.एस्सी. आणि बी.सी.ए. च्या वर्गांची सुरूवात 10 जानेवारीपासून करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी व्यवस्थापक मंडळाचे श्रीनाथ देशपांडे, प्रकाश शानभाग, तेंडूलकर, प्राचार्य अरविंद हलगेकर, प्राध्यापक अभय सामंत, भारत तोपिनकटी, प्रविण पाटील, नागसुरेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments