26 जानेवारी रोजी क्रांतीवीर संगोळी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात फिरणाऱ्या रायण्णा ज्योतीचे हुक्केरी तालुक्याच्या प्रशासनाने भव्य स्वागत करून लोकांमध्ये जनजागृती केली.
ग्रेड 2 तहसीलदार प्रकाश कल्लोली यांनी शहरातील अडविसिद्धेश्वर मठाजवळ आलेल्या ज्योतीला पुष्पहार अर्पण करून रायण्णा ज्योतीचे स्वागत केले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी वाय.सी.सिद्धनाळ म्हणाले की, संगोळी रायण्णा यांच्या जयंतीनिमित्त आज हुक्केरी शहरात आलेल्या ज्योतीचे तालुका प्रशासनातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ज्योतीला निरोप देण्यात येईल
नंतर ज्योती रथ संकेश्वर नगर येथे पोहोचला आणि अधिकाऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे पूजा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, महसूल अधिकारी मल्लिकार्जुन सारापुरे, बसवराज नांदोडकर , पालिका अधिकारी एम.बी.गुडीकेतर , संतोष हलेन्नवर, शारीरिक शिक्षण शिक्षक कोटीवाले व अंगणवाडी सेविका स्काऊट गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते.
Recent Comments