खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगावातील घर आणि खानापूर येथील घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटे छापे टाकले .
खानापूर तहसीलदार कार्यालयातही कागदपत्र पडताळणीचे काम करण्यात आले असून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणालाही आत प्रवेश नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तहसीलदार म्हणून प्रकाश गायकवाड हे कार्यरत आहेत. बेळगाव लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.
खानापुर येथील सामाजिक कार्यकर्ता विवेक तडाकोड यांनी या अवैध मालमत्तेबाबत लोकायुक्त अधिकारी आणि महसूल विभागाचे मंत्री यांच्याकडे तक्रार करून त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटेच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या खानापूर, बेळगाव येथील घर आणि खानापूर कार्यालयावर छापे टाकून तपासणी सुरू केली आहे.
Recent Comments