बेळगाव टपाल विभागातर्फे आजपासून सुरू झालेल्या इक्षुपेक्ष 2025 जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शनाला चालना देण्यात आली.

8 ते 10 जानेवारी या कालावधीत महावीर भवन, हिंदवाडी, बेळगाव येथे टपाल विभागा तर्फे इक्षुपेक्ष 2025 जिल्हास्तरीय तिकीटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून आज याला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चालना मिळाली.

यावेळी बोलताना बेळगाव टपाल विभागाचे अधीक्षक विजय वडोनी म्हणाल्या की, टपाल तिकिटांचे इतिहास सांगण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

याच प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद म्हणाले की, माहितीच्या दृष्टीने ही उत्कृष्ट प्रदर्शन असून जनतेने व विशेषतः विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

एका ज्येष्ठ मुद्रांक संग्राहकाने सांगितले की, बेळगावात तब्बल 12 वर्षांनंतर मुद्रांक प्रदर्शन भरवले जात आहे. 150 हून अधिक फ्रेम्सच्या माध्यमातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक फ्रेमला 16 शीट्स असून त्या वेगवेगळ्या कथा सांगणार आहेत, जनतेने याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.


Recent Comments