खानापुर तालुक्यातील घनदाट वनक्षेत्र समजल्या जाणाऱ्या जांबोटी परिसरातील कणकुंबीजवळ हुलंद-कणकुंबी रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिवसाढवळ्या पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. या दुचाकीस्वाराने आपली दुचाकी थांबवली आणि वाघाचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला .
पट्टेरी वाघाच्या या वावरामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच वनविभागाने याकडे लक्ष देऊन नागरिकांचे वाघांपासून संरक्षण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे . वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करून जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.
Recent Comments