मोबाईलवर रमीचे वेड, अड्ड्यावर जुगाराचे व्यसन असलेल्या एका व्यक्तीला 20 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी दोन साईट, कार, सोन्याचे दागिने असलेल्या परस्त्रीसोबत तो फरार झाला का?, लग्न होऊनही तीन मुलं असतानाही परस्त्रीसोबत पळून गेलेल्या त्या नवऱ्याविषयी खुद्द त्याच्या बायकोने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला . पण पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही .
एकीकडे पत्नीच्या शोधात पती पोलिस ठाण्यात गेला, तर दुसरीकडे प्रस्त्रीसोबत पळून गेलेल्या पतीच्या शोधात रडणाऱ्या पत्नीची परिस्थिती खूपच वाईट आहे . बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावातील ही घटना आहे . या गावातील बसवराज सितीमनी हा माँसाबी सय्यद नावाच्या विवाहित महिलेसह तिची दोन मुले आणि स्वतःच्या एका मुलासह पळून गेला आहे. पतीच्या वागण्याने बसवराजची पत्नी वनश्री हादरली असताना , बसवराजसोबत पळून गेलेल्या विवाहिता मासाबीचा पती आसिफ सय्यदही रस्त्यावर आला.
ग्रामपंचायतीची सदस्य असलेली वनश्री तिच्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर आली होती, याबद्दल वनश्रीने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र तिला पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही . तिची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट आहे की ती किराणा सामान खरेदी करू शकत नाही.
याविषयी माहिती देताना , फरार बसवराजची पत्नी वनश्री हिने, सांगितले कि, बसवराज सीतीमनीला ऑनलाइन आणि ऑफलाईन जुगाराच्या व्यसनाला बळी पडून सुमारे 20 लाखांचे कर्ज झाले होते . बसवराज आणि मासाबीचे संबंध रोखण्याचा प्रयत्न केला असता पती बसवराजने तिला मारहाण केली. गेल्या 8 वर्षांपासून तिचा पती बसवराज तिला सतत त्रास देत होता आणि बसवराज आणि वनश्री यांना तीन मुले असून तो दुसऱ्या मुलाला घेऊन पळून गेला . . या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात भटकंती करूनही तिला न्याय न मिळाल्याने वनश्रीने पती आणि मुलाचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली.
एकीकडे पत्नी बेपत्ता झाल्याने पती पूर्णपणे रस्त्यावर आला तर दुसरीकडे पती पळून गेल्याने पत्नी आणि मुलांचे जीवन रस्त्यावर आले आहे . . बेळगावचे आयुक्त याडा मार्टिन यांनी बेपत्ता होण्याचे प्रकरण गांभीर्याने घेत पळून गेलेल्या जोडप्यांना शोधण्यासाठी एक विशेष टीम तयार केली.


Recent Comments