Belagavi

शिवानंद बसवंतप्पा नंदेन्नावर यांचे मरणोत्तर नेत्र , त्वचा आणि देहदान

Share

बेळगावच्या , केएलई इंटरनॅशनल स्कूलजवळील , बसवेश्वर नगर येथील रहिवासी, शिवानंद बसवंतप्पा नंदेन्नावर (६८) यांचे ५ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले.

त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, डॉ. रामन्नावर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगलमार्फत त्यांचे डोळे, त्वचा आणि देहदान करण्यात आले. दात्याचे डोळे आणि त्वचा बेळगावच्य केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या नेत्र आणि त्वचा बॅंकेत दान करण्यात आले, तर मृतदेह धारवाड जिल्ह्यातील हुबळी के ए एच ई आर च्या जे.जी.एम.एम.सी. ला दान करण्यात आले.

प्राचार्य डॉ. एम.जी.हिरेमठ , डॉ. रामन्नावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ.महांतेश रामन्नावर यांनी नंदेन्नावर कुटुंबीयांची देहदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिवानंद बसवंतप्पा नंदेन्नावर यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आणि कन्या असा परिवार आहे .

Tags: